"स्वदेशीचा नारा"
"स्वदेशीचा नारा"
स्वदेशीचा नारा तर खूप पूर्वीपासूनचा आहे. अगदी गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९०५-१९१७ च्या कालखंडात बंगालच्या फाळणी वेळी 'स्वदेशी'चा सर्व प्रथम नारा करण्यात आला होता. चायनाला बॉयकॉट करणे हा विषय २५ वर्ष जुना आहे. "कोविड-१९" वेळी झाला तो फक्त त्याचा पुनरुच्चार. खरे पाहता यात महत्वाची भूमिका बजावणार आहे तो म्हणजे युवावर्ग व तरुण मंडळी. जर यांमध्ये 'स्वदेशीच' तत्व आलं ना तर सार काही ठीक होवून जाईल.व म्हणूनच आजच्या पिढीच्या युवकांच्या अंतःकरणास साद घालायची असेल तर त्यांच्याच पद्धतीत घातली पाहिजे व म्हणूनच ह्याशटॅगच्या(#) दुनियेत जगणाऱ्या मंडळींना साद घालण्यासाठी तयार झाला नवा ह्याशटॅग (#) तो म्हणजे '#boycottchina' व तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आता प्रतीक्षा आहे ती फक्त त्याच्या अंमलबजावणीची. आजपर्यंत आपण काहीच करू शकलो नाही,तर फक्त याविषयाबद्दल बोलतच बसलो. कोरोनाच्या नावाखाली अमेरिका आपला उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे कारण स्वतः अमेरिका चायनाचे आजपर्यंत काहीही बिघडवू शकला नाही आता वेळ आहे ते भारताला करून दाखवण्याची.'
शिक्षण, संशोधन व समाजकार्य ह्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सोनम वांगचुक यांनी "चीनीवस्तुवरील बंदी" हा मुद्दा पुन्हा एकदा काढला आहे यावेळेस हे साध्य झालच पाहिजे.१९६२ च्या युद्धापासुन या मुद्यावर जोर देण्यात आला पण ठोस निर्णया अभावी झाली ती केवळ चर्चाच.कोरोना' तर केवळ एक निमित्त आहे कारोनाने पुन्हा एकदा आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावलं आहे व आपल्याला स्वावलंबी होण्याची संधी दिली आहे.चीनीवस्तूवरील बंदी हा खरच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे व आता ती वेळ आली आहे जेव्हा स्वदेशी वापरायचं व चिनी वस्तूवर बंदी घालायची. खरे पाहता चीनला धराशाही करायचे असेल तर चीनच्या अर्थव्यवस्थेला उलथवून लावणे गरजेचे आहे. चीनला पैश्याची भाषाच समजते. लडाख मधील सैन्याला भारतीय सैन्य उत्तमरित्या चोख उत्तर देईलच पण त्याला भारतीय जनतेच्या देखील उत्तम सहाय्याची गरज आहे.सेना गोळीच्या भाषेत उत्तर देईलच तर सामान्य जनतेने सुद्धा स्वदेशीचा अवलंब करून उत्तर दिले पाहिजे."स्वदेशीचा"चा स्वीकार करून ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आता आली आहे.
ही स्वदेशीची गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करण्यामागील कारण एकूणच चिनी प्रशासनाचा एकूणच रवैया व कुटकारस्थान. पूर्वी सुद्धा हा डोकलाम विवादावेळी देखील असच वातावरण निर्माण झालं होत. योगगुरू रामदेव बाबांची देखील चिनी वस्तूवरील बंदी हा मुद्दा काढला होता.पण सहजच एखाद्या गोष्टीची सवय सुटणे देखील शक्य नसते.पण एक स्पष्ट होते की तेव्हापासूनच स्वदेशी नाऱ्याची सुरुवात झाली. भारतच नाही तर अख्या जगात शोधून एक पण ठिकाण मिळणार नाही जिथे चायनीज वस्तू मिळत नाही.सुईपासून कपड्यापर्यंत, मोबाईलपासून फ्रिज , टिव्हीपर्यंत प्रत्येक घरात चीनने स्वतः ची जागा निर्माण केली आहे. स्वस्त चिनी सामानाची नशा देशाची तिजोरी रिकामी करत आहे व ड्रॅगनला अधिक बलशाली बनवत आहे.
चीनच्या कमी किमतीत माल बनवण्याचे तंत्र मात्र आजपर्यंत कोणताही देश अजमावू शकला नाही.बाजाराची गरज ओळखून लवकरात लवकर व कमी किमतीत उपलब्ध करून देणे यात चीन माहिर आहे मग ते दिवाळीच्या तोरणा पासून आपल्या घरातील गणपतीच्या मूर्तीपर्यंत.
जरा विचार करा या चीनी उत्पादनांखेरीज तुम्ही जगू शकत नाही का? मातीच्या पणत्यानीं व पतंगी कागदाच्या आकाशकंदीलाने व गुलालाने होळी खेळल्याने तुमच्या सणांचा आनंद काही अंशी तरी कमी होतो का? आपल्या देशांत बनलेल्या पंख्याची हवा आणि कुलर कमी थंडपणा देतो का? या सर्व रोजच्या जीवनावश्यक गोष्टींच्या बाजारपेठेवरील चीनच्या वर्चस्वाचे खरे कारण चीन सरकारचे उद्योगांना केलेल सहाय्य व खंबीर पाठिंबा व म्हणूनच भारतीय कंपन्या आपले उत्पादन घेण्यासाठी चीनला पोहचल्या आहेत.आपण ' मेड इन चायना'ला टक्कर देवू शकत नाही का? आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या 'कोविड-१९' पासून चीनमधून बाहेर पडू इच्छितात त्यांना भारत आकर्षित करत आहे.सर्व जगभर चालत असलेल्या मतप्रवाहाचा उपयोग करून "मेक इन इंडिया" कडे आकर्षित करण्याची वेळ आली आहे.
तसही देश स्तरावर कंपन्यांवर बंदी घालणे वा आयातीवर मर्यादा घालणं कठीण आहे कारण जग वैश्विक व्यापाराच्या मूलतत्वावर अंमल करत आहे.जर चीनला मत द्यायची असेल तर स्वस्तची नशा व सवयीला सोडले पाहिजे व अचूक निशाणा त्यांच्या तिजोरीवर लावला पाहिजे.
अगदी साबण, टूथपेस्टपासून सुरुवात करून अगदी झोपायच्या गादीपर्यंत आपल्याला विचार केला पाहिजे की कोणत्या "मेड इन चायना" गोष्टींशिवाय आपण राहू शकतो.ज्या लॅपटॉपवर आपण काम करत आहोत व ज्या मोबाईलवरून आपण बोलत आहोत त्याला सोडण शक्य आहे का? खरच अता ती वेळ आली आहे का जिथे आपण आपला जीवन स्वदेशीकडे वळवले पाहिजे?एका देशावर राज्य अवलंबून राहण सोडला पाहिजे जेणेकरून चीनच्या आपत्तीपासून सुटका करून घेऊ शकू.
आपल्याला चीनला नाही तर चिनी वस्तूंवर विरोध केला पाहिजे जेणेकरून जी गोष्ट चीनला ताकद देत आहे ज्याच्या बळावर चीन कोणत्याही देशाची भूमी हडपण्याचा प्रयत्न करतो आहे त्या ताकदीला कमी केले पाहिजे. भारताने तर ब्रिटिशांनापण योग्य धडा शिकवला आहे व आत्ता वेळ आहे तोच धडा चीनला शिकवायची गरज आहे. तिचं पद्धत आत्ता वापरून कोरोना काळात डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला परत भक्कम करण्याची व बळकटी आणण्याची गरज आता भासत आहे.
अगदी खाण्याच्या आवडीवर पण चीन सध्या आपल्यावर हावी होवू पाहत आहे, का बर अस? अगदी लहान मुलांना मॅगी, नुडल्स आवडतात.अरे लहान मुलांना लहान वयात जेव्हा आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असते तेव्हा या गोष्टीची मुलांना का आवड लावायची? उपमा, पोहे, थालीपीठ हे भारतीयांच्या पदार्थ कुठे गेले?अगदी मोदकापासून रसगुल्ल्यापर्यंत आणि इडली, डोसापासून कोल्हापूरचा तांबडा- पांढरा रश्यापर्यंत खाद्यसंकृतीने नटलेल्या भारतात चिनी पदार्थांचे का एवढे आकर्षण? छोटया छोटया गोष्टीतून मुलांवर संस्कार करायच्या वयात या 'इन्स्टंट मॅगी'ची सवय का लावावी? अगदी एके दिवशी एक भारतीय पदार्थ खाल्ला तर तोच पदार्थ पुन्हा खायला किती दिवस उजाडतील.
स्वदेशीचा स्वीकार व चीनी वस्तुवरील बंदीचा अजून एक फायदा करून देणार आहे तो म्हणजे स्थानिक उत्पादनास चालना व उत्पादकांना दिलासा व त्यासोबतच व्यावसायिक उभारी येईल. लघु व मध्यम उद्योग भरभराटीस येतील. नकळत या कोरोना काळात फटका बसलेल्या क्षेत्रांना उभारी येईल. परप्रांतीय मजुरांना या स्थानिक उत्पादन प्रकल्पात सामील करून घेता येईल. रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.कामगारांच्या कष्टांना खरी किंमत मिळेल. आपल्याकडील उत्पादित वस्तू जरूर चीनी वस्तूपेक्षा थोड्या महाग असतील पण सोबतच टिकावू असतील.खरे आहे चीनीवस्तू तुलनेने स्वस्त असतात पण टिकावू नसतात."वापरा व फेकून द्या" या चीनी वस्तूंच्या पद्धतीमुळे घनकचऱ्यात वाढ होते.
सोनम वांगचुक यांनी विचारांची बी रोवली आहे पण भारतीयांना ती आपल्याला मनात रोवली पाहिजे व या विचारांना वटवृक्षात रूपांतरित केले पाहिजे.पण प्रत्येक भारतीयांना विचार मनात रोवला पाहिजे जेणेकरून रोजगारासाठी संधी उपलब्ध होतील व आपण स्वावलंबी होवू.जे मजूर गावी गेले आहेत आणि त्यांच्या खाण्याची व रोजगाराची सोय होण्यासाठी अर्थव्यवस्थेला मजबूत केले पाहिजे. आत्ता वेळ आली आहे "मेक इन इंडिया" संकल्पनेचा विस्तार करण्याची. कोविडने देशवासीयांना स्वावलंबी होण्याची अजून एकसंधी दिली आहे.आपण ती स्वीकारायला तयार आहोत का?
नाव: ओंकार दत्ताराम तेंडोलकर,
कुडाळ.

Nice 👍
ReplyDeleteThank u
DeleteNice Drafting..👍देशातील व्यापा-यांनी Made In India चा एक टॅग वस्तूंवर लावला पाहिजे.निदान खरेदी करताना स्वदेशीच्या वापराची कल्पना येईल. कारण आज हॅशटॅग सहज वापरता येतो.पण प्रत्यक्ष कृती होत नाही...
ReplyDeleteYes
DeletePerfect presentation of the present situation and the need of the hour that all fellow Indians should act.
ReplyDeleteGood thinking.Omkar keep it up
Thanks u😊
Deleteखूप छान प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्याला आत्मनिभर॔ बनायला वेळ नाही लागणार.
ReplyDeleteखूप सुंदर लिहीलंस.👏👌
Thanks u😊
DeleteNice 👌👌
ReplyDeleteThanks u 😊
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice! Keep it up! Listen some brilliant lectures from Think Tank
DeleteTo name few,
Achyut Godbole, Avinash Dharmadhikari, Girish Kuber, Sandeep Wasalekar, etc.
Thanks u 😊
Deleteखूप छान..!
ReplyDeleteThank u
Delete